नवी दिल्ली
एप्रिलच्या अंतिम आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यात दमदार वृद्धी झाली आहे. 28 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यात 4.532 अब्ज डॉलरची भर पडली असून तो आता 388.780 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. विदेशी चलन साठा यासोबत 10 महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. 21 एप्रिलला संपलेल्या तिमाहीत 2.16 अब्ज डॉलरची घट नोंदली गेली होती. या आधीच्या आठवड्यात चलन साठ्यात 2.16 लाख डॉलरची वाढ झाली होती.









