सांगली :
येथील मार्केटयार्डात बुधवारी काढण्यात आलेल्या बेदाणा सौदयात जत तालुक्यातील उमदी येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी 470 रूपये इतका भाव मिळाला. रमेश श्रीशैल तळी असे त्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. या चालू हंगामातील हा विक्रमी दर आहे. दरम्dयान यंदाच्या हंगामात बेदाण्याला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी यार्डात जास्तीत जास्त बेदाणा विक्रीस आणून चांगल्या दराचा फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी केले आहे.
नवीन हंगामातील बेदाण्याच्या सौदयाला सुरूवात झाली आहे. कमी उत्पादन असल्याने बेदाण्याला विक्रमी दर मिळत आहे. गेल्या आठवडयातील सौदयात 280 रूपये दर मिळाला होता. मुरगेंद्र अॅग्रोटेक सांगली या अडत दुकानात रमेश श्रीशैल तळी उमदी ता. जत येथील शेतकऱ्याचा बेदाणा शेतीमाल मनोहर कोल्ड स्टोअरेज या खरेदीदार व्यापाऱ्याने उच्चांकी दराने खरेदी केला. दुष्काळी असलेल्या जत तालुक्यातील बेदाण्याला विक्रमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सांगली मार्केटमध्ये जास्तीत जास्त बेदाणा ा†वक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती शिंदे यांनी केले.








