मुंबई
निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी शेअरबाजाराने नव्या विक्रमी स्तरावर झेप घेण्याची किमया साधली आहे. सोमवारी सेन्सेक्स तब्बल 2,500 अंकांनी वधारत 76,468 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 733 अंकांनी वधारत 23,263 या विक्रमी सर्वोच्च स्तरावर बंद झाला आहे. गुंतवणूकदारांच्या खिशात 12 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. निवडणूक निकालाबाबतच्या 1 जून रोजीच्या एक्झिट पोल अंदाजाचा सकारात्मक व दमदार परिणाम शेअरबाजारात दिसला. निफ्टीतील 25 समभाग तेजीत बंद झाले होते. बँक निफ्टी निर्देशांकही 51 हजाराच्या पातळीवर पोहचला आहे. तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया 28 पैशांनी मजबूत होत 83.14 वर बंद झाला होता.








