स्वतःच्या अधिक लांबीच्या पायांद्वारे नवी ओळख
ताडाच्या झाडासारखा उंच वाढलास असे बोली भाषेत म्हटले जाते. एका महिलेने ही तुलना जणून खरी करून दाख्घविली आहे. या महिलेची उंची अत्यंत धिक असून तिने स्वतःच्या लांब पायांच्या बळावर विश्वविक्रम केला आहे.
अमेरिकेच्या टेक्सास येथे राहणारी 19 वर्षीय मैसी क्यूरिनच्या पायांची लांबी इतकी आहे की तिने त्याच्या जोरावर गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वतःचे नाव नोंदविले आहे. 6 फूट 10 इंच उंचीच्या मैसीच्या नावावर जगातील सर्वात लांब पाय असलेल्या महिलेचा विक्रम नोंद आहे. तिच्यासमोर एखादा उभा राहिल्यास तो तिच्या पायांच्या उंचीइतका किंवा त्याहून अधिक छोटा वाटू लागतो.

मैसी आता सब्सक्रिप्शन साइट ओन्लीफॅन्सवर सक्रीय झाली आहे. आता ती तेथे एक्सक्लुझिव्ह कंटेंट विकणार आहे. मैसीचे टिकटॉकवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हे फॉलोअर्स तिचे उंच शरीर पाहून अचंबित होतात. आता ती ओन्लीफॅन्सवर स्वतःच्या चाहत्यांना पैशांच्या बदल्यात स्वतःच्या उंचीशी निगडित एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज विकणार आहे.
चाहत्यांना तिच्याशी ऑनलाईन कनेक्ट होण्यासाठी 2600 रुपये खर्च करावे लागू शकतात. माझ्या कुटंबाने स्वतःची उंची आणि पायांच्या लांबीशी संबंधित सोशल मीडिया पोस्ट शेअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. या प्रोत्साहनामुळेच मी असे करत असून आता स्वतःकडे अत्यंत सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. पूर्वी मला स्वतःच्या उंचीबद्दल चांगले वाटत नव्हते. परंतु अधिक उंच असणे वाईट नसते आणि स्वतःच्या शरीराला ते जसे आहे तसे स्वीकारावे असे वाटत असल्याचे ती सांगते.









