8 वर्षीय मुलाची कामगिरी
आतापर्यंत सर्वात कमी वयात शून्य गुरुत्वाकर्षणात राहण्याचा विक्रम एका मुलाने स्वत:च्या नावावर केला आहे. या मुलाचे वय केवळ 8 वर्षे आहे. या मुलाचे नाव जॅक मार्टिन प्रेसमॅन आहे. 8 वर्षीय जॅकने शून्य गुरुत्वाकर्षणात राहत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्वत:चे नाव नोंदविले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जॅकने 8 वर्षे आणि 33 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली आहे. एका अमेरिकन कंपनीने या उ•ाणाची व्यवस्था केली होती. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत अहवालानुसार जॅकने ही कामगिरी झिरो जीकडून संचालित एका अमेरिकन वाणिज्यिक उड्डाणावर प्राप्त केली. झिरो जी ही कंपनी अंतराळवीर प्रशिक्षण आणि वैज्ञानिक संशोधनासाठी शून्य गुरुत्वाकर्षण उ•ाणे प्रदान करते. जॅकने केलेल्या कामगिरीची कल्पना त्याच्या वयाची मुले आणि बहुतांश प्रौढ देखील करू शकत नाहीत. त्याने शून्य गुरुत्वाकर्षणात राहून आतापर्यंतच्या इतिहासात अशाप्रकारचा अविश्वसनीय अनुभव प्राप्त करणारा एकमेव मुलगा ठरला आहे.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जॅकचा व्हिडिओ शेअर केला असून यात तो स्वत:च्या आईवडिलांसोबत तरंगत असताना दिसून येतो. एकीकडे बालपणाची बहुतांश स्वप्ने मागे पडत असतात. तर जॅकने स्वत:च्या स्वप्नांना विक्रमी कामगिरीत बदलले असल्याचे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने नमूद केले आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत जॅक अन्य लोकांसोबत शून्य गुरुत्वाकर्षणात तरंगत असताना दिसून येतो. तो स्वत:च्या तोंडात पाण्याचे थेंब टाकतो, जेली बीन्स पकडण्याचा प्रयत्न करता आणि काही मजेशीर ट्रिक्स करताना दिसून येतो. जॅकला नेहमीच अंतराळाची ओढ लागून राहिली आहे. जॅकला बज लाइटियरबद्दल प्रेम होते आणि वास्तवात अंतराळाबद्दलचे त्याचे प्रेम अन् जिज्ञासा वाढविण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी स्वत:चा अंतराळ कक्षही निर्माण केला होता अशी माहिती त्याची आई जेसिका यांनी दिली आहे.
जॅकच्या घरात स्वत:ची स्पेस रुम
या स्पेस रुमचे खासगी प्रवेशद्वार होते जेव्हा तो स्वत:च्या खोलीत प्रवेश करायचा, तेव्हा एक सुंदर चांदणी आणि प्रत्येक ठिकाणी शेकडो चमकणारे तारे, नक्षत्रं, ग्रह दिसून यायचे. त्याच्याकडे स्वत:चे छोटेसे अंतराळयान देखील होते. जॅक आणि मी त्या अंतराळयानातून सरपटत जायचो. आम्ही त्याला अंतराळाविषयी कहाण्या ऐकवायचो. यामुळे अंतराळाबद्दलचे त्याचे प्रेम वाढले असावे असे जेसिका यांनी म्हटले आहे.
जॅकची इच्छा
शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव रोमांचक होता. शून्य गुरुत्वाकर्षणात असताना खूप काही शिकण्याची गरज असते. मी 18 वेळा शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला आहे. प्रत्येकवेळी 30 सेकंदांपर्यंत राहिलो असे जॅकने सांगितले आहे. जॅक पुढील काळात अंतराळवीर होऊ इच्छितो, तो अंतराळात जाणारा सर्वात कमी वयाचा व्यक्ती होण्याचा निर्धार बाळगून आहे.









