गोष्टी गालातून आर-पार करतो हा व्यक्ती
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने एका अशा व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याने चेहऱयावर सर्वाधिक छिद्राचा विक्रम मोडला आहे. ब्रिटनमधील जेम्स गॉम्सच्या चेहऱयावर 15 पियर्सिंग असून यंदा फेब्रुवारीत त्याने विक्रम नोंदविला आहे. यापूर्वी 14 पियर्सिंगसोबत तो विक्रमधारक होता.
2020 मध्ये त्याने जर्मनीतील जोएल मिगलरचा विक्रम मोडीत काढला होता. जोएलच्या चेहऱयावर 11 छिद्रं होती. मिस्टर गॉसच्या गालांवर 3 मिलिमीटर आणि 18 मिलिमीटरची छिद्र आहेत.

गोम्सच्या चेहऱयावर नाकपुडय़ांमध्ये दोन छिद्रं, वरच्या ओठाच्या वर एक छिद्र, ओठांच्या कोपऱयांमध्ये दोन छिद्र आहेत. याचबरोबर खालच्या बाजूच्या ओठाखाली चार छिद्र आहेत. तर दोन छिद्रं गालांवर आहेत. जीडब्ल्यूआर व्हिडिओत जेम्स गोम्स स्वतःच्या गालांवरील छिद्रांच्या माध्यमातून दोन चॉपस्टिकसारख्या लाकडी काठय़ांचा वापर करत आर-पार करतो. एवढेच नव्हे तर स्वतःच्या गालांमधून लाल रिबन बाहेर काढत असल्याचे पाहून कुणीही चक्रावून जाईल.
जितका अधिक मी स्वतःला बदलू शकतो, तितका मी स्वतःसोबत कम्फर्टेबल होत असतो. जर मी याबद्दल कम्फर्टेबल असेन तर इतर लोकांचे मत माझ्यासाठी महत्त्वाचे ठरत नाही असे जेम्स यांनी म्हटले आहे. जेम्सने स्वतःच्या पियर्सिंगद्वारे जे केले ते पाहून युजर्स दंग झाले आहेत. जेम्स गॉस यांना या अनोख्या कामातील स्वतःचे स्वारस्य अनेक वर्षांपूर्वीच लक्षात आले होते. शरीरात अनेक मोडिफिकेशन दिसणे मला नेहमीच पसंत पडते. किशोरवयीन असताना टॅटू, पियर्सिंग आणि ईअरलोब करविण्यात मला रुची होती असे जेम्स म्हणाले. गॉस यांनी स्वतःचे पहिले पियर्सिंग वयाच्या 13 व्या वर्षी करविले होते. एका मुलीवरील प्रेमापोटी त्यांनी हा प्रकार केला होता.









