अनेक ज्येष्ठ नागरिकांची सूचना : प्राचीन जागा आजही आहे सुरक्षित
वार्ताहर /जुने गोवे
चोडण बेटावरील ( तत्कालीन चुडामणी बेट) पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेले श्री देवकीकृष्ण मंदिर तेथील मूळ जागेवर पुन्हा उभारुन पोर्तुगीजांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी योजनेची सुरुवात करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनकडून होऊ लागली आहे.
पोर्तुगीजांनी उध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बा?धणी या गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेचे सर्वच थरातून स्वागत होत आहे. तसेच चोडणच्या नागरिकांच्या वतीने ही या घोषणेचे स्वागत होत आहे.
ज्या जागेवर श्री देवकीकृष्णाचे मंदिर होते त्याच जागेवर मंदिराची पुनर्बांधणी करावी अशी मागणी नियमितपणे उदबत्ती फुले वाहणारे नागरिक महेश आमोणकर यांनी केली आहे.
मंदिराची जागा आहे सुरक्षित
देवगी चोडण येथील वयाची शंभरी ओलांडलेले जे÷ नागरिक एकनाथ कवठणकर यांनी या गोष्टीला दुजोरा दिला असून त्यांच्या मते त्यांना त्यांच्या वडिलधाऱया कडून मिळालेल्या माहितीनुसार देवकी कृष्णा चे मंदिर वर नमूद केलेल्या जागेच्या आसपासच होते. सरकार जर या ठिकाणी मंदिर बांधेल तर चांगलेच होईल, असे ते म्हणाले.
अनेक ज्येष्ठ नागरिकांचा दुजोरा
शांताकर गाड, शिवराम ( बाबू) भोमकर, शामसुंदर चोडणकर या जे÷ नागरिकाबरोबरच पांडुरंग गांवकर, मिलिंद महाले, गजानंद चोडणकर, दयानंद ( बाबलो) वळवयीकर, दिलीप दळवी, अर्जून वळवयीकर व ईतर नागरिकांचाही या गोष्टीला दुजोरा आहे. या ज्येष्ठ नागरिकांसह अन्य अनेकजणांचे म्हणणे आहे की मंदिराची मूळ जागा हीच असून त्याठिकाणी सरकारने पुन्हा मंदिर उभे करुन इतिहासाला उजाळा देणे गरजेचे आहे.
पाचशे वर्षांपूर्वी होती अनेक मंदिरे
श्री देवकी कृष्ण संस्थान श्रीक्षेत्र माशेल गोवा समग्र इतिहास व माहिती या पुस्तकातील माहिती प्रमाणे सुमारे 500 वर्षांपूर्वी चोडण बेटावर ( तत्कालीन चुडामणी बेट) गणेश, रवळनाथ, बावकादेवी, मल्लनाथ, भगवती, देवकी कृष्ण, संतपुरुष, बारा जण, नारायण- कांतेवर, चंडेश्वर, धाडसांकळ, इत्यादी देवतांची मंदिरे होती. पोर्तुगीजांनी आपल्या धर्मांध राजवटीत ख्रिस्ती करण्याच्या त्या काळात चुडामणी बेटावर असलेल्या वरील सर्व मंदिरांचा विध्व?स केला.
पोर्तुगीज काळात झाले स्थलांतर
चुडामणी बेटावर असलेल्या मंदिरांचा विध्व?स होणार याचा सुगावा लागताच इ.स.1530 ते 1540 च्या काळात श्री देवकीकृष्ण हे दैवत मयें येथे स्थलांतरित करण्यात आले अशी नोंद आढळते. तसेच इ.स.1540 सालानंतर आणि इ.स.1567 पर्यंत च्या काळात हे दैवत मयें गावातून माशेल येथे स्थलांतरित झाल्याची नोंद आढळते.
सर्व चोडणकरांचे म्हणजेच चुडामणी बेटावरील सर्व नागरिकांचे श्री देवकी कृष्ण हे प्रमुख दैवत होते. आणि आजही चोडण बेटावरील नागरिकांचे श्री देवकी कृष्ण हे प्रमुख दैवत आहे. याचा स्पष्ट पुरावा आजही पाहावयास मिळतो.
चोडण येथे प्रतिवार्षिक शिमगा किंवा इतर उत्सवात प्रारंभी श्री देवकी कृष्ण दैवताचा बहुमान केला जातो आणि मगच सर्व वाडय़ावर तो बहुमान केला जातो. ही वहिवाट पूर्वापार चालत आलेली आहे आणि यापुढेही कायम राहणार हे कोणी ही नाकारु शकत नाही. म्हणून उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बा?धणी या योजनेची सुरुवात चोडण बेटावर भव्य दिव्य नसले तरी चालेल, पण छोटेसे टुमदार श्री देवकी कृष्णाचे मंदिर मुळ जाग्यावर बांधून करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.









