नागरिकांकडून सहकार्याचे पो. नि. स्वाती गायकवाड यांचे आवाहन, तारळे, सरवडे, शिरगाव, तळाशी येथे तारळे येथे पोलीस संचलन
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही . त्याबरोबरच शांतता आणि संयम कायम राहावा यासाठी सर्व धर्मीयांचे प्रशासनाला सहकार्य असावे ‘ व असणारा सलोखा कायम राहावा असे आवाहन राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले . तर सर्वांचेच पोलीस प्रशासनाला सहकार्य राहील अशी ग्वाही शांतता समितीच्या बैठकीच्या वतीने देण्यात आली .
कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी शांतता समिती बैठकीचे तारळे, सरवडे, शिरगाव, तळाशी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदरच्या बैठकीमध्ये गावातील परिस्थिती, सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी, प्रतिबंधक उपाययोजना ,कायदा व सुव्यवस्था राखणेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी उपस्थितांनी देखील हिंदू मुस्लिम ऐक्य, संयम बाबत विविध उदाहरण, दाखले देऊन आपली मते व्यक्त केली, सर्व गावात सामाजिक सलोखा, शांतता अबाधित राहावी. याकरिता प्रयत्न करून कोणतीही आक्षेपार्ह स्टेटस, मेसेज, व्हिडिओ, प्रसारित केले जाणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नये, तरुण मुलांना याबाबत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी अवगत करावे कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्वरित पोलीस ठाणेस अथवा 112 या क्रमांकावर कळवावे अश्या सूचना देण्यात आल्या.