राज्य मंत्रिमंडळाची पार पडली बैठक :
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून याचदरम्यान मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलाविली. या बैठकीत विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस आता राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडून स्वीकारण्यात आल्यावर सैनी हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंत कार्य करणार आहेत.









