सांगरूळ / वार्ताहर
बी.ए.एम.एस.डॉक्टर्सना रक्तपेढीमध्ये सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी राज्य रक्तपेढी असोसिएशनचे पुणे विभाग प्रमुख प्रकाश घुंगूरकर यांनी केली आहे.संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व अरोग्य मंत्र्याना लवकरच याबाबतचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले.
सध्या रक्तपेढीमध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर काम करण्यासाठी शासनाकडून एम.बी.बी,एस/एम डी पॕथॉलॉजी/ एम.बी.बी.एस. डिसीपी ही शैक्षणिक पात्रता निर्धारित केली आहे.पण ही शैक्षणिक पात्रता असणारे डॉक्टर रक्तपेढीमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्यासाठी फारसे इच्छूक नसतात.यामुळे रक्तपेढीमध्ये वैद्यकीय अधिकारी नियुक्त करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत,यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने बी. ए. एम. एस पात्रता असणारे अनुभवी डॉक्टर नियुक्त करण्यास मान्यता देऊन मार्ग काढावा अशी मागणी जोर धरत आहे.
शासनाने बी.ए.एम.एस.डॉक्टर्सना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय आधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.तसेच केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या रुग्णवाहिकेमध्ये वैद्यकीय आधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते.तसेच राज्य नोंदवहीत नोंदणीकृत असलेल्या ‘आयुर्वेद’ व ‘युनानी’ वैद्यकीय व्यावसायिकांच्या आधुनिक शास्त्रीय वैद्यक पद्धत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषम चिकित्सा पद्धती (ऍलोपॅथी) या पद्धतीमधून त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाच्या व्याप्तीपुरता व्यवसाय करण्यास परवानगी बी.ए.एम.एस डॉक्टर्सना मिळाली आहे.तसेच शासनाच्या समुपदेशन केंद्रावर समुपदेशक म्हणून नियुक्ती आसते.रक्तपेढ्यांमधील आसणारी सहायक वैद्यकीय अधिकारी या पदाची गरज ओळखून रक्तपेढीतील कामाच्या अनुभवाची अट घालून रक्तपेढीमध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टर्सना सहायक वैद्यकीय आधिकारी म्हणून काम करण्यास मान्यता मिळावी.
वैद्यकीय व्यवसायामध्ये रक्तपेढी हा महत्वाचा घटक असून वैद्यकीय उपचारांमध्ये रक्त व रक्तघटकांची मागणी वाढत आहे.बदलत्या काळानुसार रक्तपेढ्यांकडून अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आत्मसात केले जात आहे. साधारणपणे चोवीस तासामध्ये रक्तपेढ्यांचे दैनंदिन कामकाज सुरु आसलेने किमान तीन वैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक असून त्यांची शैक्षणिक पात्रता एम.बी.बी,एस/एम डी पॕथॉलॉजी/ एम.बी.बी.एस. डिसीपी असणे आवश्यक आहे. परंतु या शैक्षणिक अर्हतेचे लोक रक्तपेढ्यांचे क्षेत्र हे मर्यादित आसलेने पुढील विस्तारीकरण तसेच वैयक्तिक अर्थिक उत्पन्न यांच्यावर मर्यादा येत असल्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये काम करण्यासाठी फारसे इच्छुक दिसत नाहीत.यामुळे रक्तपेढ्यांपुढे समस्या निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काही ठिकाणी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले तर काही रक्तपेढ्यांमध्ये ‘ऑन कॉल’ वैद्यकीय अधिकारी असलेले चित्र पहायला मिळते.रक्तपेढ्या ह्या अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने केव्हाही इमर्जन्सी येऊ शकते त्यामुळे रक्तपेढीमध्ये पुर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आसणे गरजेचं आहे.या बाबींचा विचार करता रक्तपेढ्यांमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून बी.ए,एम.एस.(युनानी व आयुर्वेद वैद्यक व्यावसायिक) यांना करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी प्रकाश घुंगुरकर यांनी केली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









