अॅङ संभाजीराव मोहिते यांचे प्रतिपादन : कोमप कालिदास पुरस्कार वितरण सोहळा
पणजी, : कवी कुलगुरू कालिदासाचे वर्षातून एक दिवस स्मरण करणे म्हणजे त्याचा अपमान ठरेल. त्याच्या मेघदूतातील एका तरी श्लोकाचा विचार करावा,पारायण केले तर त्याचे ते कायम स्मरण ठरेल असे सांगून नामवंत कायदेतज्ञ, लेखक ,विचारवंत तथा वक्ता ऍड संभाजीराव मोहिते यांनी जुनी आपली बसलस्थाने जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज प्रतिपादिली.कोकण मराठी परिषद गोवा तर्फे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) च्या सहयोगाने येथील आयएमबी च्या परिषदगृहात सोमवारी झालेल्या ’आषाढस्य प्रथम दिवसे’ कार्यक्रमात ऍड. मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यांच्या हस्ते कोमप चा यंदाचा कालिदास पुरस्कार नामवंत कवी तथा चित्रकार य बा सुतार उर्फ चित्रसेन शबाब यांना प्रदानकरण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, लामणदिवा व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप होते.मंगेश काळे यांनी मानपत्राचे वाचन केले. व्यासपीठावर प्रमुख वत्ते संत सहित्याचे अभ्यासक डॉ. गोविंद काळे,आयएमबी चे अध्यक्ष दशरथ परब,कोमप चे सल्लागार ऍड रमाकांत खलप,अध्यक्ष सागर जावडेकर, कार्याध्यक्ष नारायण महाले, सचिव चित्रा क्षीरसागर ,कोषाध्यक्ष अजित नार्वेकर ही मंडळी उपस्थित होती.
मानवी मनाचे उन्नयन कालिदासाला महर्षी व्यासांना करायचे होते म्हणून त्यांनी ज्ञानाचा दिवा लावला असे स्पष्ट करून डॉ. गोविंद काळे यानी ,नवकवी मर्ढेकरांना सुध्दा आषाढ मानवतो हे त्यांची एक कविता उदऊत करून पटवून दिले. कालिदासाचे स्मरण म्हणजे परंपरेचे, संस्कृतीचे स्मरण करून आपण धन्य होतो.यावेळी डॉ. काळे यांचा दशरथ परब यांच्याहस्ते तर ऍड. मोहिते यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, समई देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी ऍड मोहिते यांचा तर नारायण महाले यांनी डॉ. काळे यांचा परिचय करून दिला. जीवनात निष्ठेने करता आले ते माझे यश आहे. पण जे करायचे राहून गेले त्याचे दु:ख मी करणार नाही. कोल्हापूरचे कवी भोसले,गजानन रायकर असे शिक्षक लाभले.स्फूर्तीगीते कानावर पडली.अनेक प्रतिभा समोर आल्या आणि पुढे मौज, सत्यकथा, अनुष्टुभ अशा प्रतिष्ठेच्या मासिकात कविता प्रसिद्ध होऊ लागल्या.सरकारी कर्मचारी असल्याने टोपण नावाने लिहायला लागलो. आपल्या कलाकृतीचे मनन चिंतन करणे गरजेचे असते. आज समाजात अनेक गोष्टींची उलथापालथ झाली आहे, ही भयाण परिस्थिती लेखक ,कवींना दिसली पाहिजे. आपण जे माध्यम स्वीकारतो त्यावर प्रभुत्व हवे. सागर जावडेकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ऍड खलप यांनी सांगितले की, आपल्या भाषांपासून मुले दूर जातात याला आम्हीच जबाबदार आहोत. बिंदिया वस्त यांनी गायिलेल्या शारदास्तवनाने सोहळ्याला प्रारंभ झाला. नेहा उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले.दुस्रया सत्रात चित्रसेन शबाब यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले त्यात सुमारे तीस कवी कवयित्रींनी कविता सादर केल्या. कालिका बापट यांनी सूत्रसंचालन केले.ठधरावे उन्हाचे फेडू नये देणे.. सावलीला म्हणे तडा जातो..ठ अशा आशय गर्भ ओळींनी शबाब यांनी सुरवात केली.









