मुंबई : राज्यातील इतिहासात शिवसेनेमध्ये सर्वात मोठं बंड सुरू झाले असून महा विकासआघाडी (mahavikas aghadi) सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते. शिवसेनेच्या गोटात वातावरण तापले असताना राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) गोटात नेमकं काय चाललंय? हे देखील समोर आलेलं आहे.
राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडी मध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती वारंवार समोर येत होती. तर विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर ही धुसफूस आता चव्हाट्यावर आलेली आहे. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील काही फुटीरवाद्यांनी भाजपला मदत केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये दुफळी माजली आहे. त्यातूनच शिवसेनेतील नाराज गट नॉट रिचेबल राहून थेट गुजरातला पोहोचलेला आहे.
शिवसेनेच्या नाराज गटाने थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती आम्हाला नको आहे, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गोटात काय चाललंय? हे देखील पहाणे महत्त्वाचा आहे.
राज्यातील राजकीय घडामोडी ने घेतलेला वेग पाहता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) देखील अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांना फोनवरून संपर्क साधून राज्यातील घडामोडीची माहिती घेतली. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत बैठक पार पाडून ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील दिशा स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे नियोजित दौरे रद्द करून मंत्र्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या आहेत.
या संपूर्ण घडामोडीचा सर्वात जास्त धोका तो काँग्रेसला आहे. विधान परिषद निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेसचे गटनेते असलेले व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे गटनेते पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान काँग्रेसने देखील सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असून त्यांची बैठक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








