मुंबई
बॉलीवूडचा सेन्सेशनल कपल म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्पोटाच्या चर्चेला उधाणच आले होते. ऐश्वर्याने आपल्या नावातून बच्चन काढून टाकल्यानंतर या चर्चांनी अधिकच वेग घेतला. दरम्यानच्या काळात असे काही प्रसंग ही घडत गेल्याने. या चर्चांना मोठे बळ मिळु लागले. पण अभिनेत्री ऐश्वर्याने सांगितेल्या काही गोष्टी लक्षात घेता, अशा कारणांमुळे कदाचित अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या काडीमोड होता होता वाचला, असे दिसून येत आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या सोबत दोघांच्या परिवारातील मतभेदांच्या बातम्याही पसरल्या होत्या. अभिषेक बच्चन सोबत अभिनेत्री निम्र कौर हीचे ही नाव जोडले जाऊ लागले. पण अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनी यावर कोणतिही प्रतिक्रिया दिली नाही. अशातच हे कपल आता एकत्र दिसू लागल्यामुळे अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे. तर घटस्फोटाच्या सर्व चर्चा खोट्या असल्याचेही सिद्ध झाले आहे.
अभिषेक बच्चनचा ५ फेब्रुवारीला वाढदिवस असतो. सोबत ऐश्वर्या आणि अभिषेक विविध माध्यामातून एकमेकांविषयी नेहमीच भरभरून बोलत आले आहे. अशातच एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्या त्यांच्या नात्याबद्दल मोकळीकतेने बोलली.
मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा ती म्हणाली, आम्हाला खूप काही जुळवून घ्यावे लागते. दोन्ही बाजूंकडून कधी एकमत असतं तर कधी असहमती. लग्नात दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. दोन स्वतंत्र व्यक्तीमत्त्व आहेत. त्यामुळे सहमती असहमती, होकार नकार हे सुरुच असतात. प्रसंग काहीही येऊदे संवाद तुटला नाही पाहीजे. यावर माझा विश्वास आहे.
पुढे ती म्हणाली, नात्यामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा असतो. अभिषेक ने याचा नेहमीच आदर केला आहे. तुम्हाला तुमच्या नात्यासाठी दररोज वेळ द्यावा लागतो. प्रत्येकाने आपल्या जोडीदाराचा आदर केला पाहीजे. मी एखादी गोष्ट आजपर्यंत संपवू असे म्हणणारी नाही. पण नात्याला योग्य वेळ दिला पाहीजे. त्याशिवाय हे नाते टिकणार कसे ? आम्ही काही परफेक्ट कपल नसून एकमेकांन समजून पुढे जात आहोत, असेही अभिनेत्री ऐश्वर्या राय म्हणाली.
ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेवर अमिताभ बच्चन यांनी ही त्रस्त होऊन एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी लिहीले होते, वेगळे होण्यासाठी आणि आयुष्यात त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यासाठी खूप धैर्य, विश्वास आणि प्रामाणिकपण असावा लागतो. मी माझ्य़ा कुटुंबाबद्दल फारच कमी बोलतो. मला ते खासगी ठेवायला आवडतं. अफवा या फक्त अफवा असतात आणि पुराव्याशिवाय रचलेल्या गोष्टी असतात. असे काहीसे या पोस्टमधून बिग बी व्यक्त झाले होते.









