मिरज :
शहरातील समतानगर येथे अवैधरित्या शस्त्रसाठा बाळगणाऱ्या दोघा तऊणांना पकडून तीन तलवारी व एक कोयता जप्त करण्यात आला. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयीत सलमान रियाज मुल्ला (वय 23, रा. जैननगर, जुना हरिपूर रस्ता, समतानगर, मिरज) आणि साबीर इस्माईल अन्सारी (वय 20, रा. म्हैसाळ रस्ता, म्हाडा कॉलनी, मिरज) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.
वाढत्या गुन्हेगारीच्या अनुषंगाने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महात्मा गांधी चौकी पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले होते. या पथकातील पोलिस कर्मचारी जावेद शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत समतानगर येथे दोघे तऊण अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावून संशयीत सलमान मुल्ला व साबीर अन्सारी अशा दोघांना ताब्यात घेतले.








