मुंबई
बांधकाम क्षेत्राचा रियल्टी इंडेक्स अर्थात निर्देशांक 15 वर्षानंतर नव्या उच्चांकावर पोहचला आहे. बुधवारी या क्षेत्रातल्या समभागांमध्ये शेअरबाजारात चांगली तेजी अनुभवायला मिळाली. बांधकाम क्षेत्रातल्या कंपन्यांनी आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत विक्रमी घर विक्री केली असल्याचे समजते. बुधवारी रियल्टी निर्देशांक इंट्रा डे दरम्यान 4886 अंकांवर पोहचला होता. सोमवारपासून पाहता निर्देशांक 4 टक्के इतका वधारला आहे. यापूर्वी 12 सप्टेंबर 2008 रोजी हा स्तर कंपनीच्या समभागाने गाठला होता.









