नारझो एन 53 या मॉडेलचा समावेश
नवी दिल्ली
चीनी टेक कंपनी रियलमी यांनी रियलमी नारझो एन53 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा सर्वात कमी जाडीचा फोन राहणार असून याची जाडी ही 7.49 एमएम इतकी असल्याची माहिती आहे. कंपनीने हा लो बजेट सेगमेंटचा स्मार्टफोन सादर केला असून आयफोन 14 प्रो मध्ये ऑफर केलेल्या डायनॅमिक आयलंड प्रमाणेच सदरच्या नव्या फोनमध्ये फिचर देण्यात आले आहेत. रियलमीने या फिचरला मिनी कॅप्सुल असे नाव दिले आहे. यामध्ये बॅटरी, चार्जिंग स्थितीसह सूचना ग्राहकांना मिळू शकणार आहे.
अन्य फिचर्स
डिस्प्ले : रियलमी नारझो एन53 मध्ये 90 एमएच रिफ्रेश रेटसह 6.74 इंच डिस्प्ले मिळणार
?हार्डवेअर व सॉफ्टवेअर: फोन कामगिरीसाठी युनिशॉक टी612 प्रोसेसरद्वारे समर्पित करण्यात येणार आहे.
? कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये डबल कॅमेरा सेटअप मिळणार आहे.








