वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चीनी टेक कंपनी रियलमीने आपला नवा स्मार्टफोन रियलमी 11 प्रो 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 23 हजाराच्या पुढे असणार असल्याची माहिती आहे. कंपनीने प्रो व प्रो प्लस असे दोन प्रकारातील फोन सादर केले आहेत. सेलअंतर्गत स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना या फोन्सवर 2 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. रियलमी 11 प्रो 5 जी 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह येणार असून ज्याची किमत 23 हजार 999 रुपये इतकी तर 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 24 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसहच्या फोनची किमत 27 हजार 999 रुपये इतकी असेल. प्रो प्लस प्रकारातील 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 27 हजार 999 रुपये व 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किमत 29 हजार 999 रुपये असणार आहे. प्रोचा सेल पहिला सेल 15 जून रोजी दुपारी 12 नंतर तर प्रो प्लसचा पहिला सेल 16 जून रोजी दुपारी 12 नंतर सुरु होईल.
इतर वैशिष्ट्यो पाहुया
- 6.7 इंचाचा कर्व्ह फुल्ल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले
- मीडियाटेक डायमेनसिटी 7050 प्रोसेसर
- अँड्रॉइड 13 रियलमी युआय 4.0 ऑपरेटिंग सिस्टम
- 100 एमपीचा (प्रोमध्ये) तर 200 एमपीचा (प्रो प्लस) कॅमेरा
- 67 डब्ल्यूचा फास्ट चार्जर (प्रो) तर 100 डब्ल्यूचा फास्ट चार्जर (प्रो प्लस)
- 5000 एमएएचची बॅटरी









