रियलमी कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन रियलमी 10 आता बाजारात सादर केला आहे. 50 मेगापिक्सलसह डबल कॅमेऱयांचा सेटअप असणारा 4 जी स्मार्टफोन ग्राहकांना मिळणार आहे. सदरच्या स्मार्टफोनची किमत ही 13,999 रुपये इतकी राहणार असून ज्याची विक्री ही 15 जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
…हा फोन दोन प्रकारात सादर
सदरचा फोन हा दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. पहिला प्रकार 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसह उपलब्ध होणार आहे. या मॉडेलची किंमत 13,999 रुपये राहणार आहे, तर दुसऱया बाजूला 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची सुविधा असणाऱया स्मार्टफोनची किमत 16,999 रुपये राहणार असल्याची माहिती आहे.
अन्य फिचर्स ः
w 6.4 इंच पूर्ण एचडी स्क्रीन
w मीडिया टेक होलिओ जी99 एसओसी
w कॅमेरा 50 एमपीसह अन्य सुविधा
w 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी









