वृत्तसंस्था / माद्रीद
ला लिगा फुटबॉल स्पर्धेतील येथे रविवारी झालेल्या सामन्यात रियल माद्रीदने रेवो व्हॅलेकेनोचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या विजयामुळे रियल माद्रीदने आघाडीवर असलेल्या बार्सिलोनाशी गुणतक्त्यात बरोबरी साधली आहे. दरम्यान या स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमध्ये अॅटलेटिकोला चांगलाच धक्का बसला आहे.
रियल माद्रीद आणि व्हॅलेकेनो यांच्यातील सामन्यात रियल माद्रीदतर्फे कायलेन एम्बापे आणि व्हिनीशियस ज्युनियर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या विजयामुळे रियल माद्रीदने अॅटलेटिको माद्रीदपेक्षा 1 गुण अधिक मिळविला आहे. अॅटलेटिको माद्रीदला रविवारी झालेल्या सामन्यात गेटाफीकडून 1-2 अशा गोलफरकाने अनपेक्षित हार पत्करावी लागली होती. अॅथलेटिक बिलबाओ आणि मॅलोर्का यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला आहे.









