वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या आठवड्यात यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केयर सर्व्हिसेस लिमिटेडचा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव बाजारात दाखल होणार आहे. या आयपीओमार्फत कंपनी 490 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा मानस करते आहे.
आयपीओ 26 जुलै रोजी खुला होणार असून 28 जुलैला बंद होणार आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना यात पैसे गुंतवता येणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी मुंबई शेअरबाजार (बीएसई) व राष्ट्रीय शेअरबाजार (एनएसई) यावर कंपनीचे समभाग लिस्ट होणार आहेत. रिटेल गुंतवणूकदारांना किमान 50 (एक लॉट)समभागांमध्ये पैसा गुंतवता येणार आहे.
आयपीओची किंमत
आयपीओची किंमत 285-300 रुपये प्रति समभाग असणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांना 13 लॉटसाठी बोली लावता येते. यातील 35 टक्के हिस्सा हा रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि 50 टक्के हिस्सा पात्रताधारक संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के हिस्सा राखीव आहे.
कंपनीबाबत….
कंपनीची नोएडा, ग्रेटर नोएडा, झांसी आणि ओरछा येथे चार हॉस्पिटल्स आहेत. या आयपीओतून उभारलेली रक्कम कंपनी कर्जाचा भार कमी करणे, भांडवल खर्च व इतर कारणांसाठी वापरली जाणार आहे.