मुंबई :
यथार्थ हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सेंटर यांचा समभाग एनएसईवर सोमवारी नाममात्र 2 टक्के प्रिमीयमसह 306.10 वर खुला झाला होता. समभागाची इशु किंमत 300 रुपये इतकी होती. लिस्टींगनंतर समभाग 341 रुपयांवर पोहचला होता. बीएसईवर हा समभाग 304 रुपयांवर लिस्ट झाला आणि त्याने 340 रुपयांवर मजल मारली होती. हॉस्पिटलच्या आयपीओला 37 पट गुंतवणूकदारांचा प्रतिसाद लाभला आहे.









