Reading of Preamble at Boarding Ground on Constitution Day
समाज कल्याण विभाग व बार्टी यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त राज्यात समता पर्व 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. समतापर्व उपक्रमांतर्गत मालवण येथील बोर्डिंग ग्राउंड येथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या उपक्रमामध्ये मालवण शहरातील खेळाडू सहभागी झाले होते. बार्टी व समाज कल्याण विभाग यांच्यावतीने दरवर्षी मालवण बोर्डिंग राऊंड येथे संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला नितीन वाळके यांचे सहकार्य लाभले. संग्राम कासले यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
मालवण / वार्ताहर