Reading is important for development!
इनरव्हील क्बल अध्यक्षा दर्शना रासम यांचे प्रतिपादन
इनरव्हिल क्लबकडून आरोस `विद्याविहार’ला पुस्तकांची भेट
वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आजूबाजूच्या जगातील माहिती होते . वाचनातून आपण ज्ञान संपादन करताना विचारशक्ती वाढते आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची प्रेरणा मिळते. समाजाातील सर्व लोकांशी वागण्याची कला वाचनाने अवगत होते. मुलांचा सर्वांगीण विकासासाठी वाचन महत्वाचं असल्याचं प्रतिपादन सावंतवाडी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. दर्शना रासम यांनी केले.
आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व काfनष्ठ महाविद्यालय या वाचनालयाला सावंतवाडी इनरव्हील क्लबतर्फे पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ. रासम बोलत होत्या. यावेळी सावंतवाडीतील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ . सौ. अमृता स्वार, इनरव्हिल क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. मृणालिनी कशाळीकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सौ. सुषमा मांजरेकर, सौ. अनुष्का गावडे, प्रा. नितीन बागवे, प्रा. सौ. कामत, विवेकानंद सावंत, नीलेश देऊलकर, मोहन पालेकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ . स्वार यांनी `एक कळी उमलताना’ या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. किशोरावस्था किंवा यौवनावस्था मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. ज्यामध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात. शारीरिक बदल, योग्य आहार, मासिक पाळी तसेच घ्यावयाची काळजी याबाबत डॉकटर . स्वार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विद्यार्थिनींनासॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक धूपकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुषमा मांजरेकरयांनी तर आभार सौ. अनुष्का गावडे यांनी मानले.
वार्ताहर
न्हावेली









