विविध भरगच्च उपक्रमांचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिर यांच्यावतीने वाचन प्रेरणा दिन”चे औचित्य साधून बुधवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १९ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष तथा कवी दीपक पटेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त वाचन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने वाचनालयाच्यावतीने ‘ग्रंथ प्रदर्शन’, ‘मी वाचलेले पुस्तक’, ‘वाचू आनंदे’ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच ‘तुम्ही वाचा मुले वाचतील!’ हा अभिनव उपक्रम देखील यावेळी संपन्न होणार आहे. यावेळी “मारुती चितमपल्ली” व “जयंत नारळीकर” या दोन लेखकांच्या ग्रंथ प्रेमी श्री. आवळे यांनी वाचनालयासाठी स्नेह भेट म्हणून दिलेले सुमारे पाच हजार रुपये किमतीच्या पुस्तकांचे ‘ग्रंथ प्रदर्शन’ लावण्यात येणार आहे. याचे उद्घाटन कवी दीपक पटेकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी दाणोली व माडखोल केंद्रात नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत वाचनालयाच्यावतीने करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री समर्थ साटम महाराज वाचन मंदिरचे अध्यक्ष भरत गावडे, सचिव डॉ सावंत यांनी केले आहे.









