मालवण : प्रतिनिधी
श्री शिवाजी वाचन मंदिर मालवण तर्फे १५ ऑक्टोबर हा दिवस डॉ ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. यावर्षी ३५० व्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर मराठी मनात व्हावा यासाठी शिवचरित्र आधारावर आणि इतर विषयांवर इयत्ता ३ री ते ५ वी व ४ थी ते ८ वी या दोन गटात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. छोट्या गटासाठी परीक्षक श्री. सुधीर गोसावी तर मोठया गटासाठी सौ. शुभदा लुडबे यांनी काम पाहिले. दोन्ही गटामधे मुलांचा चांगला सहभाग होता. खेळीमेळीच्या वातावरणात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. परीक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करताना स्पर्धेची तयारी कशी करावी, वाचनाचे महत्व कायॽ, त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात हे सांगून मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मोठा गट विजेते
• प्रथम क्रमांक- कु. आर्या दिघे
• द्वितीय क्रमांक- कु. वेदिका लुडबे
• तृतीय क्रमांक- कु. अनुष्का गावकर
लहान गट विजेते
• प्रथम क्रमांक- कु. श्रीवर्धन संदीप पारकर
• द्वितीय क्रमांक- कु. पार्श्व प्रकाश शिरहट्टी
• तृतीय क्रमांक- कु. शौनक शैलेश पावसकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शांभवी कोळगे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. वैदेही जुवाटकर यांनी केले. यावेळी नवीन बाल साहित्य, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम व शिवरायांच्या जीवनावर लिहीलेली विविध लेखकांची ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ मेधा शेवड़े उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे कोषाध्यक्ष कोळंबकर, कार्यवाह सौ वैदेही जुवाटकर, सौ मानसी दूधवडकर श्री संतोष कोचरेकर आणि वाचक तसेच स्पर्धकांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र व प्रथम तीन क्रमांकाना पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले . मुलांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









