कट्टा येथील वराडकर हायस्कूल व महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न
कट्टा/प्रतिनिधी
वाचन संस्कृती काळाची गरज बनली असून आज वाचाल तर वाचाल ही म्हण खऱ्या अर्थाने सिद्ध होताना दिसते. असे प्रतिपादन वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कट्टा या ठिकाणी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केले .प्रास्ताविक ग्रंथपाल सुकाळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वरचित काव्यवाचन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्वरचित काव्य वाचन स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक दिशा विजय गावडे, द्वितीय दामिनी दिलीप वायगणंकर ,तृतीय प्राची संभाजी परब ,उत्तेजनार्थ रोहिणी त्रिगुण कदम आणि अवधूत वैभव आचरेकर ,माध्यमिक गटात प्रथम मानसी संतोष गरुड ,द्वितीय स्वाती प्रकाश वराडकर, तृतीय समीक्षा संदीप गरुड, प्राथमिक विभागांमध्ये वक्तृत्व स्पर्धेतून प्रथम क्रमांक कृतिका लोहार ,द्वितीय वेदांत सतीश पाटकर ,वैदेही सतीश पाटकर, उत्तेजनार्थ नयन निलेश घोगळे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांना भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आली. यासाठी परीक्षक म्हणून सौ मळेकर मॅडम, श्रीम. पालव मॅडम, श्री सावंत सर, दळवी मॅडम यांनी काम पाहिले. या वेळी पर्यवेक्षिका , गावडे डी डी मराठी विभाग प्रमुख श्री संजय पेंडूरकर जेष्ठ शिक्षिका श्रीमती ज्योती मालवदे तसेच उच्च माध्यमिक व माध्यमिक चे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते. आभार श्री मासी सर यांनी तर सूत्रसंचालन श्री जांभवडेकर सर यांनी केले.
या कार्यक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर ,विश्वस्त श्री एस. एस. पवार कर्नल , शिवानंद वराडकर ,सचिव सुनीलजी नाईक, व सचिव श्रीमती देसाई मॅडम यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.









