दै. तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर यांचे प्रतिपादन : दामोदर जोशी यांच्या ‘मागे वळून पाहता’ पुस्तकाचे प्रकाशन
वाळपई : दशावतारी नाटकांमध्ये उभी हयात घालवलेले बिंबल सत्तरीचे सुपुत्र मास्टर दामू अर्थात दामोदर भालचंद्र जोशी यांच्या ‘मागे वळून पाहता’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा, श्री महागणपती देवस्थान, बिंबल, सत्तरी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला दै. तऊण भारतचे संपादक सागर जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्याचबरोबर प्रमुख वत्ते म्हणुन ह.भ.प. विवेक जोशी, खोतोडा ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव राणे, पंच रोहिदास गावकर व राजाराम परवार, देवस्थानाचे अध्यक्ष विनायक भावे, रंगकर्मी श्री अभय जोग व मंगला जांभळे उपस्थित होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीत केवळ दशावतारी नाटकांच्या प्रेमापोटी लेखकाने केलेले कार्य या पुस्तकात आहे. लेखकाने छोटे छोटे प्रसंग लिहिले असले तरी पुस्तक वाचताना हे प्रसंग डोळ्यासमोर जिवंत स्वरुपात दिसतात, असे हभप विवेक जोशी यावेळी म्हणाले. या पुस्तकाचा उपयोग दशावतारी कलाकारांना नक्की होऊन हे पुस्तक त्यांच्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल. या पुस्तकातील एक एक प्रसंग म्हणजे एक पुस्तक होईल, असे ते यावेळी म्हणाले. पुस्तक प्रकाशनानंतर लेखक दामोदर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दामोदर जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सागर जावडेकर यांच्या हस्ते सत्कार, तसेच मंगला जांभळे यांनी दीपाली दामोदर जोशी यांची ओटी भरली. व अभय जोग तसेच नितीन कोलवेकर यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. अनेक ग्रामस्थांनीही त्यांचा यथोचित सत्कार केले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी केले. स्वागत दीप्ती इब्रामपूरकर यांनी केले तर प्रास्ताविक अभय जोग यांनी. कु. कुंजीका व साक्षी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणपती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अभय जोग यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेले एका तासाचे दशावतारी नाटक सादर करण्यात आले. यात स्वत: दामू जोशी, गुऊदास गावस, विद्याधर तुळपुळे, किरण तुळपुळे, गणेश उसपकर आणि अमेय किंजवडेकर कृष्णा खर्डे, भूषण काळे यानी सहभाग घेतला.









