मुंबई
ऑटोमोबाइल रिटेल व्यवसायात असणाऱया लँडमार्क कार्सच्या आयपीओला 43 टक्के इतका तिसऱया दिवशी गुरुवारी गुंतवणूकदारांचा प्रतिसाद प्राप्त झाल्याची माहिती आहे. कंपनी आयपीओतून आगामी काळात 552 कोटी रुपये उभारणार आहे. 17 टक्के रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांनी तर 87 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी याकरीता प्रतिसाद नोंदवला होता. आयपीओची 481-506 रुपये प्रति समभाग किंमत निश्चित करण्यात आली आहे.









