Jitendra Awhad: ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस आणि आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत.अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात,ट्रेनमध्ये,रेल्वे पुलावर,गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’होत असतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड दिली. तक्रारदार महिलेची राजकीय महत्त्वकांक्षा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कलम 354 लावणं हा कारस्थानाचा भाग आहे. हे सगळ जाणीवपूर्वक केलं जात आहे. तक्रारदार महिलेची राजकीय महत्त्वकांक्षा आहे.विनयभंग झाला हे पोलिसांनी सिध्द करावं असे पोलिसांना आवाहन जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने केले आहे.आम्ही केलं की गुन्हा, दुसऱ्यांनी केलं की चूक अस का?असा सवालही त्यांनी केला आहे. त्या महिलेवर आधीच गुन्हे दाखल आहेत. ती महिला जामीनावर बाहेर आहे. सत्तेतील लोकांच्या डायऱ्या उघडायच्या का? खासदारांशी तू तू मै मै झाल्यानंतर शंकेची पाल चुकचुकली होती. सध्या खालच्या पातळीतील राजकारण सुरु असल्याचेही त्या म्हणाल्या.जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








