वृत्तसंस्था/ बेंगळूर
महिला प्रीमियर लीगमध्ये सुपर ओव्हरमध्ये झालेल्या नाट्यामय पराभवातून सावरत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आज गुऊवारी येथे तळाच्या स्थानावर असलेल्या गुजरात जायंट्सचा सामना करणार असून या सामन्यातून गाडी पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे लक्ष्य संघ मैदनात उतरताना बाळगेल. या गतविजेत्यांनी दोन विजयांसह चांगली सुऊवात केली होती, परंतु मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सविऊद्धच्या सलग पराभवांनी त्यांची गती थांबविली.
मंगळवारच्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असल्याने आरसीबी विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक असेल. दरम्यान, गुजरात जायंट्सला चार सामन्यांत फक्त एक विजय मिळवता आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविऊद्धचा त्यांचा मागील पराभव हा जास्तच निराशाजनक होता. कारण त्यांना 100 धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही.
यूपी वॉरियर्सकडून झालेल्या पराभवाचा सर्वांत जास्त फटका स्मृती मानधनाच्या संघाला बसेला असेल. कारण खेळ बराच काळ त्यांच्या नियंत्रणाखाली राहिला होता. पण शेवटच्या तीन षटकांत त्यांना 42 धावांचा बचाव करता आला नाही. यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊ तेथे त्यांना फक्त चार धावा करता आल्या. मानधनाला स्वत: फॉर्मसाठी संघर्ष करावा लागला आहे. चार डावांमध्ये तिने फक्त एक मोठी खेळी नोंदवली आहे. ऑफस्पिन तिच्यासाठी घातक ठरली असून महिला प्रीमियर लीगमध्ये 11 वेळा ती ऑफस्पिनवर बाद झाली आहे.
चांगल्या बाबींमध्ये इंग्लंडच्या डॅनी वायट-हॉजने वरच्या फळीत चांगली कामगिरी केली आहे, तर ऑस्ट्रेलियन अनुभवी खेळाडू एलिस पेरीने तीन अर्धशतके झळकावली आहेत. तथापि आरसीबीची गोलंदाजी प्रभावी ठरलेली नाही. त्यांच्या वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि किम गार्थ सातत्य दाखवू शकलेल्या नाहीत. तसेच फिरकीपटू जॉर्जिया वेअरहॅम, एकता बिश्त आणि कनिका आहुजा मधल्या षटकांमध्ये नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्या आहेत.
दुसरीकडे, गुजरात जायंट्सला फलंदाजीतील अडचणी अजूनही सतावत आहेत. गेल्या सामन्यात संघाने टॉप ऑर्डरमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न करताना हरलीन देओलला सलामीवीर म्हणून आणले होते आणि संघर्ष करणाऱ्या लॉरा वोल्वार्ड्टच्या जागी फोबी लिचफिल्डला संधी दिली होती. परंतु हा बदल यशस्वी झाला नाही. त्यातच सुऊवातीच्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली त्यांची कर्णधार अॅश्ले गार्डनर फलंदाजी व गोलंदाजीतही पुढे चमक दाखवू शकलेली नाही.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









