वृत्तसंस्था/ मुंबई
विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल तसेच दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि तंत्रशुद्ध फलंदाज ए.बी. डीव्हिलीयर्स यांचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आल्याची घोषणा या संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने केली आहे.
आरसीबीच्या हॉल ऑफ फेममध्ये ख्रिस गेल आणि डीव्हिलीयर्स यांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा माजी कर्णधार कोहलीने केली आहे. 2011 ते 2021 या कालावधीत डीव्हिलीयर्स रॉयल चँलेजर्स बेंगळूर संघातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला गेला. तसेच विंडीजच्या गेलने सहा वर्षे आरसीबीचे प्रतिनिधीत्व केले होते. क्रिकेट क्षेत्रामध्ये गेल आणि डीव्हिलीयर्स यांचे योगदान महत्वाचे असल्याने त्यांचा या संघातर्फे हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून गौरव करण्यात आला आहे. 2011 ते 2017 या कालावधीत गेल आरसीबी संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होता.









