मुंबई
रिझर्व्ह बँकेने कर्जाबाबत निर्बंधाचे धोरण गुरुवारी जाहीर केल्यानंतर शुक्रवारी शेअरबाजारात विविध बँकांचे समभाग नुकसानीत असताना दिसले आहेत. यामध्ये आरबीएल बँकेचे समभाग शुक्रवारी अंतिम सत्रात 9 टक्के इतके घसरत 230 रुपयांवर खाली आले होते. याआधीच्या सत्रात बँकेचे समभाग 254 रुपयांच्या भावावर बंद झाले होते. बँकेचे बाजार भांडवल मूल्य 14,177.53 कोटी रुपयांवर राहिले होते.









