मुंबई
बँकिंग क्षेत्रातील दिग्गज आर. सुब्रम्हण्यकुमार हे आरबीएल बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओ पदाचा कार्यभार यापुढे सांभाळणार आहेत. येत्या 24 जूनपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. याआधी त्यांच्या जागेवर राजीव आहुजा हे कार्यरत होते. गेली 40 वर्षे आर. सुब्रम्हण्यकुमार हे बँकेमध्ये कार्य करत आहेत. याआधी त्यांनी चेन्नईतील इंडियन ओव्हरसीज बँकेचे सीईओ व एमडी पद सांभाळले होते. त्यामुळे त्यांना बँकिंग कार्यक्षेत्रातील कामाचा गाढा अनुभव आहे.









