आरबीआयच्या निर्णयावर केले भाष्य : व्याजदर स्थिर ठेवल्याची बाब योग्यच
नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) पतधोरण बैठकीत रेपोदर कायम ठेवल्याच्या निर्णयाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, मला वाटते की आरबीआयने योग्य पाऊल उचलले आहे. आरबीयाच्या सहा सदस्यांनी पतधोरण समितीने एकमताने रेपो दर 6.50 टक्के सीतारामन म्हणाल्या, कोविड महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे प्रतिकूल परिस्थिती असतानाही महागाई सहा टक्क्यांच्या खाली ठेवण्यात आली आहे. महागाईच्या मुद्यावर केंद्र सरकार अत्यंत संवेदनशील असून कारवाई करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रशिया- युक्रेन युद्धाचा आयातीवर परिणाम
कोविड महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा भारतातील आयात वस्तूंच्या किमतींवर परिणाम झाला आहे. सरकारने अनुदानासह अनेक उपाययोजना केल्या आहेत. कोविड आणि रशिया-युक्रेन युद्धानंतरच्या परिस्थितीची तुलना केली का? आपण आयात करतो त्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्या भारतात तयार होत नाहीत. आम्ही पूर्णपणे आयात करत असल्याचेही मंत्री सीतारामन यांनी सांगितले आहे. कच्चे तेल आणि घरगुती गॅस आयात केले जाते, सरकार त्यांना सबसिडी देण्याचा प्रयत्न करते आहे. आम्ही सबसिडी देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.









