ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात ५०० रुपयांच्या सर्वात जास्त बनावट नोटांचा वापर वाढला असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. त्याखालोखाल दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा वापर देखील वाढला असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन मोदींना लक्ष्य केलंय.
मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानक देशात पाचशे आणि एक हजारांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. त्याविरोधात लोकांमध्ये रोषाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. या नोटाबंदी करण्यामागे काळा पैसा देशातनं हद्दपार करणे हे आपलं धोरण असल्याचं मोदी सरकारने म्हटलं होतं. मात्र आरबीआयनं दिलेल्या एका माहितीत सध्या चलनात असणाऱ्या पाचशे आणि दोन हजारांच्या नोटामध्ये सर्वात जास्त बोगस नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळत असल्याचं म्हटलं आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत, RBI ला ५०० रुपयांच्या १०१.९ टक्के अधिक बनावट नोटा सापडल्या आणि २ हजार रुपयांच्या बनावट नोटांमध्ये ५४.१६ टक्के वाढ झाली असल्याचे म्हंटले आहे.
आरबीआय काय म्हणतंय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार देशात ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे.या शिवाय दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर घटला आह्रे. २०२०-२१ या वित्तीय वर्षात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १०१.९ टक्के इतकी वाढ झाली आहे. तर दोन हजारांच्या नोटांच्या बनावट वापरात ५० टक्कयांची वाढ झाल्याचं आरबीआय म्हणतेय.महत्वाचं म्हणजे ५० आणि १०० रुपयांच्या बनावट नोटा बनवण्यात मात्र घट झालेली पाहयला मिळाली आहे.