भारतीय रिझर्व्ह बँकेने निवेदन जारी केले आहे. त्यानुसार देशात सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
चलनी नोटांवरच्या महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या जागी रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची प्रतिमा छापण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा विचार आहे. असे वृत्त काही खासगी माध्यमांमध्ये प्रसारित काण्यात आले होतं. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं आज हे निवेदन जारी केलं. त्यामुळे आता नोटांमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.