मुंबई :
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवारपासून सुरू झाली असून आज गुरुवार, 10 ऑगस्टला पतधोरण जाहीर होणार आहे. रेपोदरासंबंधीचा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून घोषित केला जाणार आहे. रेपोदर या खेपेसही जैसे थे ठेवला जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी या खेपेलाही रेपोदरामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही, असा दावा आर्थिक तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. याआधीची पतधोरण समितीची बैठक 6 ते 8 जून या कालावधीत घेण्यात आली होती. ज्यात रेपोदर जैसे थे ठेवण्यात आला होता. तर फेब्रुवारीच्या पतधोरण समिती बैठकीमध्ये रेपो दर 6.25 टक्केवरून 6.50 टक्के इतका करण्यात आला होता.









