मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण विषयक समिती आगामी काळात रेपो दरात कमी वाढ करु शकते, असा अंदाज डय़ूश बँकेने व्यक्त केला आहे. सप्टेंबरच्या चलनविषयक आढाव्यात रिझर्व्ह बँक रेपो रेट 0.25 टक्क्यांनी वाढवू शकते असे मत डय़ूश बँकेने मांडले आहे. केंद्रीय बँकेने या वर्षी मे महिन्यापासून रेपो दरात 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. चलनवाढ रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर कायम आहे. बँक ऑफ जर्मनीने एका अहवालात म्हटले आहे की, येथून रिझर्व्ह बँक व्याजदर वाढीचा वेग कमी करेल.









