जवळपास 44 लाखांचा दंड : नियम व सरकारी आदेश पाळले नाहीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने बंधन बँकेला 44.7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने काही नियम आणि सरकारी निर्देशांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. 31 मार्च 2024 पर्यंतच्या आर्थिक स्थितीची तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात बँकेला यापूर्वीही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये बँकेला दंड का लावू नये याची कारणे दाखवा असे सांगण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई, ग्राहकांसाठी सुरक्षित व्यवहार आरबीआयने म्हटले आहे की, बंधन बँकेने काही कर्मचाऱ्यांना कमिशन म्हणून पैसे दिले. तसेच, बँकेने काही खात्यांच्या डेटामध्ये मॅन्युअल बदल केले, परंतु या बदलाची नोंद ऑडिट ट्रेल सिस्टममध्ये ठेवण्यात आली नाही.









