भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट म्हणून कार्य करणार
नवी दिल्ली
पेटीएम पेमेंट्स बँकेला भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट (बीबीपीओयू) म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. बीबीपीओयू अंतर्गत, बीबीपीओयूला वीज, फोन, डीटीएच, पाणी, गॅस विमा, कर्ज परतफेड, फास्टटॅग रिचार्ज, शिक्षण शुल्क, क्रेडिट कार्ड बिल आणि नगरपालिका करांच्या बिल भरणा सेवा प्रदान करण्याची परवानगी मिळणार आहे.
ग्राहकांना याचा लाभ मिळणार
आरबीआयनुसार पीपीबीएल सर्व एजंट संस्था त्यांच्या वेबसाइटवर प्रदर्शित करेल. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अधिकाऱयाने सांगितले की, पेटीएम ऍपद्वारे वापरकर्ते सोयीस्करपणे त्यांची बिले भरू शकतील आणि स्वयंचलित पेमेंट आणि रिमाइंडर सेवांचा लाभ घेऊ शकतील.









