वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारताचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने विंडीजमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रिमियर लिग (सीपीएल) क्रिकेट स्पर्धेतून काही वैयक्तिक अडचणीमुळे माघार घेतली आहे. सदर माहिती रायुडूने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. चालू वर्षीच्या प्रारंभी रायडूने आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर विंडीजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रिमियर लिग स्पर्धेत तो सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीयटस् संघाकडून तीन सामन्यात खेळताना 47 धावा जमवल्या होत्या. विंडीजच्या सीपीएल स्पर्धेत खेळणारा रायडु हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. यापूर्वी प्रवीण तांबेनेही या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवला होता. आता सेंट किट्स संघाने रायडूच्या जागी इंग्लंडच्या बेनी हॉवेलला घेतले आहे. त्याचप्रमाणे मुजारबनी यानेही सेंट किट्समधून माघार घेतल्याने त्याच्या जागी विल स्मिडला संधी दिली आहे.









