दोन दिवसापूर्वी हरिहरेश्वर येथे संशयास्पद आढलेल्या बोटीमअध्ये एके 47 बंदुका आढळून आल्या. यानंतर राज्यभर हायअलर्ट जारी करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या घटनेने देशभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे नेते ज्येष्ठ बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. कोणताही हल्ला होणार नाही याची सतर्कता संरक्षण विभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काळजी घ्या पण काळजी करू नका असेही त्यांनी म्हटलं आहे. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, समुद्रकिनारी बोट आढळून आली त्यामध्ये एके 47 च्या बंदुका सापडल्या त्यामुळे वेगळं वातावरण निर्माण झाले आहे. पण राज्याचे गृहमंत्री यांनी या संदर्भात संपूर्ण खुलासा केला आहे. आपली संरक्षण यंत्रणा सतर्क आहे, त्यामुळे असा कोणताही हल्ला होणार नाही याची सतर्कता संरक्षण विभाग घेत आहे. कोणताही हल्ला होणार नाही याची दक्षता घेतली जाईल याची खात्री मला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Previous Articleश्री कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा
Next Article कोयना धरणाची दारे साडे चार फूट उचलली








