रवा लाडू म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण काही-काहींना रव्याचा लाडू अजिबात खायला आवडतं नाही. अशावेळी तुम्ही त्यात बेसन पीठ मिक्स करा खूप सुंदर लाडू होतात. ही रेसीपी बनवायला ही सोपी आहे. अगदी कमी वेळात होतात. चला तर जाणून घेऊया रेसीपी.
रवा बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१ अगदी बारीक रवा
१ कप साखर
१/२ कप बेसन
कप साजूक तूप
आवडीनुसार सुकामेवा (बदाम आणि काजू)
वेलची पूड
१/२ कप पाणी
पिस्त्याचे काप
कृती
सुरुवातीला दोन ते तीन चमचे तुप पॅनमध्ये घ्या त्यात रवा टाकून तो भाजून घ्या. रवा जास्त लालसर भाजू नका. अगदी मंद आचेवर ठेवून तुप आणि रवा मिक्स झाल्यावर मस्त असा वास यायला लागतो त्यानंतर गॅस बंद करा. आता पॅनमधून रवा बाजूला काढून ठेवा. उरलेले तूप घालून त्यात आता डाळीचं पीठ चांगल भाजून घ्या. आता भाजलेला रवा त्यात अॅड करून दोन्ही मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण तयार झाल्य़ावर आता पाक करायला घ्या. १ कप साखरेमध्ये अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक करून घ्या. पाक करत असताना साखर विरघळ्यानंतर गॅस मंद आचेवर करा. ५ ते ६ मिनिटात तुमचा पाक तयार होईल. यानंतर त्यात वेलची पावडर टाका. गॅस बंद करा. वेलची पावडर चांगली मिक्स झाल्यावर रवा आणि डाळीचे मिश्रण त्यात अॅड करा. ते मिश्रण अर्धा ते एक तास गार होण्यासाठी ठेवा. त्यानंत लाडू वळून घ्या.
टीप- पाक करत असताना जर पाक बिघ़डला तर काय करावे
पाक करत असताना तो बिघडण्य़ाची शक्य़ता नाकारता येत नाही. अशावेळी काही ट्रिक्सचा वापर करून तुम्ही लाडू चांगले करू शकता.
-पाक जर सैल झाला तर ते मिश्रण थोडं गरम करून घ्या. त्यानंतर थोडा वेळ थंड करा आणि लाडू वळा.
-पाक खूपचं पुढे गेला असेल तर मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या. त्यात पुन्हा १ चमचा साखरेचा पाक तयार घाला. मिश्रण मऊ होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









