ऑनलाईन टीम/तरुण भारत
चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) नवा कर्णधार रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आयपीएल हंगामाच्या मध्यात धक्कादायक निर्णय घेतला आहे. आयपीएल २०२२ मध्ये सातत्याने खराब कामगिरी केल्यानंतर हंगामाच्या मध्यात कर्णधारपद सोडण्याची घोषणा जडेजाने केली आहे. खेळावर लक्ष देण्यासाठी जडेजाने टीमचं नेतृत्व सोडण्याचं ठरवलं, तसंच त्याने धोनीने (MS Dhoni) पुन्हा एकदा कर्णधार व्हावं म्हणून विनंती केली. धोनीनेही जडेजाची ही विनंती मान्य केली आहे, त्यामुळे आता पुढच्या सामन्यापासून सीएसके पुन्हा एकदा धोनीच्याच नेतृत्वात मैदानात उतरेल.
गतविजेत्या आणि ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या सीएसकेची कामगिरी यंदाच्या मोसमात सुरवातीपासून निराशाजनक झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये सीएसके नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नईने ८ पैकी फक्त २ मॅच जिंकल्या तर ६ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. जडेजाने आठ सामन्यांत सहा पराभव पत्करल्यानंतर पुन्हा धोनीकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी याची घोषणा केली. जडेजाला आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे.
जडेजाने कर्णधारपद सोडत एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. एमएस धोनीने चेन्नईच्या हितासाठी नेतृत्व करण्याचे स्विकार केले आहे आणि जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी दिली आहे,” असे म्हटले आहे.









