ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. कसब्यात पहिल्या आठ फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 3325 मतांनी आघाडीवर आहेत. आठ फेऱ्यांमध्ये धंगेकर यांना 30500 मतं मिळाली आहेत. तर रासने यांना 27,175 मतं मिळाली आहेत.
कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात दुरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री, नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








