वेंगुर्ला –
वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी दिपेश परब यांची निवड झाली आहे. तर दैनिक तरुण भारत संवादचे रविकिरण परब यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यावेळी दीपेश परब आणि अजित राऊळ यांच्यात गुप्त मतदान होऊन लढत झाली. यामध्ये दीपेश परब यांना 12 मते तर अजित राऊळ यांना 10 मते पडली. त्यामुळे अध्यक्षपदावर दिपेश परब विजयी होऊन विराजमान झाले. तर कार्यकारिणीच्या इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सचिवपदी विनायक वारंग, खजिनदारपदी दै. तरुण भारत संवादचे जाहिरात प्रतिनिधी प्रदीप सावंत ,सहसचिवपदी दै. तरुण भारत संवादचे उपसंपादक समीर गोसावी यांची निवड झाली आहे. तर पत्रकार संघाच्या सल्लागार पदी सावळाराम उर्फ दाजी नाईक आणि मॅक्सी कार्डोज यांची निवड झाली आहे . तर प्रथमेश गुरव , अजय गडेकर , संदीप चव्हाण , सीताराम धुरी , शंकर घोगळे , भरत सातोस्कर , संदेश राऊळ , अनिल निखार्गे , जिल्हा पालक सदस्य महेंद्र मातोंडकर अशी नूतन कार्यकारिणी सदस्यांची नावे आहेत . निवडणूक निरीक्षक बाळ खडपकर , राजन नाईक , मावळते अध्यक्ष मॅक्सी कार्डोज यांच्या उपस्थितीत सदर निवडणूक पार पडली .









