Rajesh Kshirsager : कोल्हापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह ४० शिवसैनिकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसारग यांनी पत्रकार परिषदेत इंगवले यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी त्या ठिकाणी असतो तर ठोकून काढलं असत असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावरुन कोल्हापुरात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे त्याप्रमाणे आम्ही वागत आहोत. शाहूंच्या कोल्हापुरात महिला संदर्भात अशी वर्तुणूक करणे हे लज्जास्पद आहे. पोलिस अधिकारी तेथे उपस्थित असताना असा प्रकार घडला हे योग्य नाही. यावर आता विचार करायला हवा. यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करताना सामाजिक भान ठेवणं गरजेचं आहे. जी घटना घडली ती योग्य नाही. अतिशय वाईट शब्द वापरला. मिरवणूकीत दंगा घालण्यासाठी जे लोक होते ते पैसे देऊन आणले होते. महिलांसोबत जी वर्तणूक केली ती योग्य नाही. मी जर त्या ठिकाणी असतो तर ठोकून काढलं असतं असेही ते म्हणाले.
नेमकं काय घडल
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये राजेश क्षीरसागर गटाच्या बूथ समोर मिरवणूक आल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले अध्यक्ष असलेल्या फिरंगाई तालीम मंडळाची मिरवणूक आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. यावेळी मंडपाच्या व्यासपीठावरील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, हातवारे आणि शिवीगाळ करण्यात आली असे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत काल उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाला असला, तरी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









