बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रवी पाटील यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू केला असून नागारिक आणि विविध संटनांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

रवी पाटील यांनी गुरुवारी सांयकाळी देशपांडे गल्ली,, मारुती गल्ली, गणपत गल्ली, बुरूडगल्ली, रामलिंग खिंड गल्ली, बसवान गल्ली यासह शहराच्या मुख्य बाजारपेठेतून प्रचार रॅली काढली. प्रचारादरम्यान नागरिकांचा आणि महिला मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी फुलांची उधळण करत स्वागत केले. यावेळी नागरिकांनी भाजपला जाहिर पाठिंबा दिला.
आज शिवबसवनगर येथे आयोजित प्रचार रॅलीत खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके प्रचारात सहभागी झाले होते. या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.









