राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यात व धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढलेला जोर वाढल्याने व धबधब्याने धारण केलेले उग्ररूप यामुळे राऊतवाडी धबधबा सह तालुक्यातील आडोली पैकी दुबळेवाडी येथिल धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. पाण्याच्या वेगाचा अंदाज येत नसल्याचे लक्षात घेऊन अनुचित प्रकार घडू नये, म्हणून येथील प्रशासनाने आजपासून पावसाचा जोर कमी होईपर्यंत पर्यटकांना या धबधब्याच्या ठिकाणी बंदी केली आहे.
राऊतवाडी धबधबा सह तालुक्यातील अनेक धबधबे गेल्या काही वर्षात पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. मोठ्या संख्येने पर्यटक वर्षा सहलींसाठी येथे येतात. सध्या पावसाचा जोर वाढल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला.गेल्या चार दिवसांत राधानगरी तालुक्यात पावसाने जोर धरल्याने राऊतवाडी व दुबळे वाडी धबधब्याला मोठा व प्रचंड वेगाने पाण्याचा स्त्रोत सुरू झाला आहे. यातून मोठमोठे दगड धोंडे वाहून येतात. पाण्याला वेग इतका आहे की, पाण्यात उतरणेही धोक्याचे ठरत आहे. वा यामुळे तहसील व पोलिस प्रशासनाने राऊतवाडी धबधब्याने उग्र रूप धारण केल्याने पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.फक्त आपत्कालीन व अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांना वगळून प्रतिबंध करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे,पर्यटकांना हा धबधबा बंद केला आहे. आजपासून पावसाची तीव्रता कमी होऊन धबधब्याचा प्रवाह आटोक्यात येईपर्यंत ही बंदी असेल अशी माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली.