सहा संघांचा समावेश, 120 खेळाडूंची निवड
बेळगाव : कुडची व करडीगुद्दी येथील क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी राऊत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. सदर स्पर्धेसाठी 120 खेळाडूंची निवड करुन त्यामध्ये 6 संघांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेत पीजीएस स्पोर्ट्स बीएलके, एस.जी.स्पोर्ट्स बीएलके, विराट इलेव्हन- केडीडी, सहारा स्पोर्ट्स-एमडीजी, टायटन्स मोदगा, लावण्या स्पोर्ट्स सांबरा या संघाचा समावेश आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज जाधव, अब्दुल बागवान, प्रशांत जाधव, युवराज जाधव, आरीफ बाळेकुंद्री, साकीब आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सहा संघादरम्यान साखळी सामने खेळून अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.









